शर्जील उस्मानीवर जातीय तेढ निर्माण करण्याचा गुन्हा दाखल करा (व्हिडिओ)

 

जळगाव,प्रतिनिधी । एल्गार परीषेत पुणे येथे ३० जानेवारी रोजी शर्जील उस्मानी याने हिंदू समाजाबद्दल अवमानजनक आक्षेपार्ह गंभीर वक्तव्य केल्याबद्दल त्याच्यावर १५३ ए अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीतर्फे पोलीस अधिक्षांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

भाजपा जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे  यांना दिलेल्या निवेदनाचा आशय असा की, अलिगढ मुस्लीम विद्यापीठातील माजी विद्यार्थी असलेल्या शर्जील उस्मानी याने पुणे येथे ३० जानेवारी रोजी आयोजित एल्गार परिषदेत धार्मिक तेढ वाढवणारे अवमान जनक आणि हिंदू समाजाचा अपमान करणारी विधाने केली आहेत. त्याच्या विधानामुळे दोन धर्मामध्ये तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. भारतीय जनता पक्ष जळगाव जिल्हा ग्रामीण व महानगर यांनी शर्जील उस्मानीवर आयपीसी कलम १५३ ए अंतर्गत गुन्हा नोंद करण्याचे निर्देश देण्यात यावे तसेच अशा गंभीर स्वरूपाचे विधान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर जिल्हाध्यक्ष भाजपा जळगाव ग्रामीण आ. राजूमामा भोळे, जिल्हाध्यक्ष भाजपा जळगावमहानगर दीपक सूर्यवंशी, महापौर सौ. भारती सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील, मनपा गटनेते भगत बालाणी, मनपा स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, दीप्ती चिरमाडे, मनोज भांडारकर, सचिन पानपाटील महेश जोशी, आनंद सपकाळे, अक्षय चौधरी, विनोद मराठे, प्रकाश पंडीत, डॉ. राधेश्याम चौधरी, धीरज वर्मा  आदी उपस्थित होते.        

 

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/723559564969139

Protected Content