शिवाजीनगर रेल्वे पुल वाहतुकीसाठी बंद

जळगाव प्रतिनिधी । तब्बल १०४ वर्षांपासून जळगावकरांच्या सेवेत असणारा शिवाजीनगर रेल्वे पूल आज सकाळपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

जळगाव शहर आणि शिवाजीनगरला जोडणार्‍या रेल्वे पुलास पाडून तेथे नवीन उड्डाण पुल उभारण्यात येणार आहे. या अनुषंगाने आज सकाळी सात वाजेपासून या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. जिल्हा परिषद चौक आणि शिवाजीनगर चौक या दोन्ही ठिकाणी जेसीबीच्या माध्यमातून खड्डे खोदून यावरील वाहतूक आज सकाळपासून बंद करण्यात आली आहे. यामुळे आता जळगावच्या इतिहासाचा साक्षीदार असणारा हा पूल काळाच्या पडद्याआड जाण्यास प्रारंभ झाल्याचे मानले जात आहे. येथे लवकरच नवीन पुलाची उभारणी होणार आहे. या कालखंडात नागरिकांना पर्यायी रोडचा वापर करावा लागणार आहे.

Add Comment

Protected Content