भारतीय शॉर्ट फिल्मला ऑस्कर पुरस्कार

नवी दिल्ली वृत्तसंस्था भारतात बनलेल्या पीरियड : एंड ऑफ सेंटेन्स या शॉर्ट फिल्मला मानाचा ऑस्कर पुरस्कार जाहीर झाला आहे.

९१व्या अकॅडमी अ‍ॅवॉर्ड समारंभात आज भारतात बनलेल्या पीरियड : एंड ऑफ सेंटेन्स या लघुपटाला ऑस्कर पुरस्कार जाहीर झाला आहे. नावातच नमूद असल्यानुसार हा चित्रपट मासिक पाळी आणि याच्याशी संबंधीत असणार्‍या सामाजिक मान्यतांवर भाष्य करणारा आहे. गुनीत मोंगा यांनी या लघुपटाची निर्मिती केली आहे. नवी दिल्लीजवळ असणार्‍या हरीपूर या गावातील कथा या लघुपटात घेण्यात आली आहे. यात या गावातील महिला पाळीबाबत असणार्‍या पारंपरीक विचारांना छेद देण्याचा प्रयत्न करत असल्याचे दर्शविण्यात आले आहे.

Add Comment

Protected Content