पुन्हा खुनाने हादरले जळगाव : तांबापुरातील तरूणाचा मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील तांबापुरा भागात रात्री एका कुटुंबावर झालेल्या हल्ल्यात तरूणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

काल रात्री तांबापुरा भागातील एका कुटुंबावर टोळक्याने सशस्त्र हल्ला चढविला. यात संजय सिंग प्रदीप सिंग या तरूणाच्या वर्मी घाव लागल्याने त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले. तथापि, त्याची प्राणज्योत मालवली. तर याच हल्ल्यात संजय सिंग याचे वडील प्रदीप सिंग तसेच अन्य चार सदस्य जखमी झाले आहेत. यातील दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे कळते.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यासोबत अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा आदी सहकार्‍यांनीही दुर्घटना स्थळाची पाहणी केली. रात्री उशीरापर्यंत या संदर्भात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Protected Content