पिता-पुत्राची एकाच वेळेस निघाली अंत्ययात्रा !

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील वणगाव मुलाणे येथील पिता आणि पुत्राचा एकाच वेळेस नदीत बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

वडगाव मुलाणे येथील लालसिंग पंडित पवार हे आपल्या कृष्णा या मुलासोबत दिवाळीच्या दिवशी शेतामध्ये गेले होते. शेतातून परत येत असतांना कृष्णाचा पाय घसरून तो नदीत पडला. यामुळे लालसिंग पवार यांनी देखील नदीत उडी घेऊन त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र या दोघांनाही पोहता येत नसल्याने नदीत दोघांचा बुडून मृत्यू झाला.

लालसिंग पवार आणि कृष्णा पवार या दोन्ही बाप-लेकाचा एकाच वेळेस करूण अंत झाल्यामुळे वडगाव मुलाणेसह परिसरातवर शोककळा पसरली आहे. काल सकाळी अतिशय शोकाकुल वातावरणात या दोन्हींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आमदार किशोर पाटील यांनी मयतांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

Protected Content