उध्दव ठाकरेंच्या समर्थनाचे अडीच लाख प्रतिज्ञापत्रे रद्द

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेनेच्या मालकीवरून उध्दव ठाकरे यांच्या गटातर्फे सादर करण्यात आलेली सुमारे अडीच लाख प्रतिज्ञापत्रे रद्द करण्यात आली आहेत.

ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून पक्षाच्या लाखो सदस्यांच्या मार्फत पाठिंब्याची प्रतिज्ञापत्रे जमा करण्यात आली आहेत. निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या विहीत नमुण्यामध्येच ही प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक होते. मात्र शिवसेनेच्या काही पदाधिकार्‍यांकडून विहीत नमुण्यामध्ये प्रतिज्ञापत्र सादर न करण्यात आल्यानं ही प्रतिज्ञापत्र बाद ठरवण्यात आली आहेत. उध्दव ठाकरे गटाने साडेआठ लाख सदस्यत्वाचे अर्ज आणि प्रतिज्ञापत्रे आयोगाच्या दिल्ली कार्यालयात पाठविली आहेत. दोन्ही गटाकडून नाव आणि चिन्ह यावर दावा करण्यात आल्यामुळे निवडणूक आयोगाकडून चिन्हासह नाव देखील गोठवण्यात आलं. त्यामुळे आता दोन्ही गटाकडून शिवसेना ही आमचीच आहे हे सिद्ध करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सदार करण्यात येत आहेत. त्यातच ठाकरे गटाची अडीच लाख प्रतिज्ञापत्र रद्द ठरली आहेत.

वास्तविक पाहता उध्दव ठाकरे गटाकडे ११ लाख प्रतिज्ञापत्रे तयार होती. मात्र आयोगाने ती बाद ठरवली असती म्हणून ही प्रतिज्ञापत्रे ठाकरे गटाने आयोगाला पाठविलीच नाहीत. याचा आगामी न्यायालयीन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Protected Content