भाजपचे मंदिर प्रवेशासाठी महाविकास आघाडी सरकार विरोधात आंदोलन

 

पारोळा, प्रतिनिधी । महाविकास आघाडी सरकारच्या मंदिर बंद निर्णया विरुद्ध पारोळा भाजपाच्या वतीने तीर्थक्षेत्र श्री बालाजी मंदिराचे प्रवेशद्वारा समोर भजन गाऊन तसेच महाविकास आघाडी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. भाजपा तालुकाध्यक्ष अॅड.अतुल मोरे यांच्या नेत्वृत्वात लाक्षणिक उपोषणाला सुरवात करण्यात आली.

याप्रसंगी अॅड.अतुल मोरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या देवस्थाने व मंदिरे बंदच्या आदेशाविरुध्द बोलतांना आघाडी सरकारने दारु दुकाने,बिअरबार उघडण्याच्या निर्णयावर टीका केली. अनलॅाक काळात सर्वच व्यवहार सुरु असतांना केवळ मंदिरे बंदचा अट्टहास का? असा सवाल करुन मंदिरे देवस्थाने याच्यांवर अवलंबून असणारे फुलवाले,प्रसाद विक्रते, मुर्ती विक्रेते, हॅाटेल व्यवसायिक यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली असल्याने छोटे व्यवसायिक अडचणीस सापडल्याचे सांगितले.

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष सुरेंद्र बोहरा, प्रवीण दाणेज, गोपाल अग्रवाल, शहराध्यक्ष मुकुंदा चोधरी, सरचिटणीस सचिन गुजराथी, गणेश पाटील, समाधान पाटील, व्यापारी मोर्चा अध्यक्ष केशव क्षत्तीय,रवि पाटील, नरेंद्र राजपुत्र, अमोल पाटील, अॅड.गणेश पाटील अॅड.दत्ताजी महाजन, शाम पाटील, समीर वैद्य, अनिल टोळकर, डॉ. नानाभाऊ पाटील, विश्वास पाटील, सुमीत राजपुत्, नितीन राजपुत्, भाऊसाहेब पाटील, संकेत दाणेज आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content