खऱ्या अर्थाने आरोग्यदूत म्हणून नाव सार्थक करणारे काम ( व्हिडिओ )

जामनेर : प्रतिनिधी । आज जामनेरात ग्लोबल महाराष्ट्र मल्टी स्पेशॅलिटी हॉस्पिटलचे उदघाटन म्हणजे खऱ्या अर्थाने आरोग्यदूत म्हणून नाव सार्थक करणारे काम माजी मंत्री आणि आमदार गिरीश महाजन यांनी केलेले आहे , या शब्दात या रुग्नालयाच्या उदघाटन सोहळ्यात त्यांचे कौतुक माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यानीं केले

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले कि , आरोग्यदूत म्हणून गेली २० वर्षे सातत्याने रुग्णसेवा करीत आहेत . त्यांनी या रुग्णालयाच्या रूपाने आता आधुनिक वैद्यकीय सुविधा जामनेरात आणल्या आहेत . दानशूर व्यक्ती कडून मिळणारी मदत , सामाजिक संस्थाचे सहकार्य आणि सरकारी योजनांचा लाभ याचा मेळ घालून ते येथील रुग्णांना माफक दरात उपचार मिळवून देणार आहेत . येथे टेलिमेडिसिन सुविधा हे महत्वपूर्ण वैशिष्ट्य ठरणार आहे . त्यामुळे येथे लांबून रुग्ण येतील . त्यांनी सांगितले तसे मराठवाडा आणि विदर्भातूनपण येतील . कोरोनाकाळात आपण सर्वांनी हे अनुभवले आहे कि आपली आरोग्ययंत्रणा कशी तोकडी आहे . ज्या अन्य आजाराच्या रुग्नांना कोरोनाने घेरले त्या रुग्णांना सर्वात जास्त त्रास सहन करावा लागला हे वास्तव आहे . त्यामुळे गिरीश महाजन यांनी हे उचललेले पुढचे पाऊल खूप महत्वाचे ठरते . सर्व आजारांचे कोरोना रुग्ण येथे दाखल होऊ शकतात हे महत्वाचे आहे त्यामुळे निश्चितच आरोग्यसेवेतील महाजनांचे हे पुढचे पाऊल आहे . रुग्णालयाची भरभराट होवो असा सदिच्छा देण्याचा प्रघात नाही पण येथे येणाऱ्या रुग्णांना आरोग्य लाभो आणि त्यांचे आशीर्वाद गिरीशभाऊंना मिळत राहोत ही माझी पण प्रार्थना आहे पाहताक्षणी गिरीश महाजनांचे वय कुणी सांगू शकणार नाही मी त्यांच्या घरी गेलो होतो तेंव्हा त्यांची नातवंडेही त्यांना गिरीशभाऊ म्हणून ओळखत होती कारण ते गेल्या २ दशकातील रुग्णसेवेत असताना मिळालेल्या रुग्णांच्या आशीर्वादामुळे चिरतरुण ठरलेले आहेत, असा गौरव करत देवेंद्र फडणवीस यांनी .गिरीश महाजन यांना पुन्हा सदिच्छा दिल्या .

या ग्लोबल महाराष्ट्र मल्टी स्पेशॅलिटी हॉस्पिटल उदघाटन सोहळ्यात खा. रक्षाताई खडसे , जि प. अध्यक्षा रंजना पाटील , आ. राजूमामा भोळे , आ. किशोर पाटील , आ. संजय सावकारे , महापौर भारती सोनवणे , माजी खा. उल्हास पाटील , माजी केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भांबरे , आ. चंदूभाई पटेल , माजी आ. गुरुमुख जगवाणी , माजी आ. स्मिता वाघ यांच्यासह जिल्ह्यातील निमंत्रित मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जामनेर नागरपरिषदेकडून माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला . त्याच प्रमाणे कोरोनाकाळातील सेवेबद्दल लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे , अरविंद देशमुख यांचा सत्कार माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला .

 

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले गिरीश महाजन यांच्या कार्याचे कौतुक

https://www.facebook.com/watch/?v=1207924952934357

Protected Content