सी.ई.टी. परीक्षांमुळे विद्यापीठाच्या पाच दिवसांच्या परीक्षा पुढे ढकलल्या

 

जळगाव, प्रतिनिधी । बी.एड., एम.पी.एड. व एम.सी.ए. अभ्यासक्रमाच्या सी.ई.टी. परीक्षांमुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पदवी, पदविका व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्ष/अंतिम सत्राच्या होणाऱ्या ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून सुधारीत तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र शासनाने बी.एड., एम.पी.एड. व एम.सी.ए. अभ्यासक्रमाच्या सी.ई.टी. परीक्षांचे तसेच त्यानंतर या अभ्यासक्रमांच्या फिल्ड टेस्ट चे आयोजन जाहीर केले असल्यामुळे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या (नियमित व बॅकलॉगसह) विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा विद्यार्थी हित लक्षात घेवून पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

दि. २१, २२, २३ तसेच २८ आणि २९ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यात २१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या परीक्षा या आता १ नोव्हेंबर रोजी तर २२ ऑक्टोबर रोजी होणारी परीक्षा ९ नोव्हेंबर रोजी, २३ ऑक्टोबरची परीक्षा १० नोव्हेंबर रोजी, २८ ऑक्टोबरची परीक्षा ११ नोव्हेंबर रोजी आणि २९ ऑक्टोबरची परीक्षा १२ नोव्हेंबर रोजी त्याच वेळेस ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने होणार आहेत. ऑफलाईन परीक्षा त्याच परीक्षा केंद्रावर होतील अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक श्री. बी.पी. पाटील यांनी दिली आहे.

Protected Content