जळगावात व्याघ्र संवर्धन जनजागृती मोटार सायकल रॅलीस उत्साहात प्रारंभ

new photo

जळगाव, प्रतिनिधी | जागतिक व्याघ्र दिनाच्या निमित्ताने जळगांव आणि यावल वनविभागाच्या आणि जिल्ह्यातील पर्यावरण वादी संस्थांच्या सहकार्याने व्याघ्र संवर्धन जनजागृती मोटार सायकल रॅलीचा शुभारंभ आज (दि.२८) सकाळी १०.०० वाजता करण्यात आला. ही रॅली दोन दिवस जिल्ह्यात फिरणार असून पाल येथे उद्या सायंकाळी तिचा समारोप होणार आहे.

अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर व आमदार सुरेश भोळे यांनी रॅलीस हिरवी झेंडी दाखवली. त्या प्रसंगी जळगाव वनविभागाचे उपवनसंरक्षक दिगंबर पगार, टायगर कॉन्झर्वेशन अँड रिसर्च सेंटर मुंबईचे अध्यक्ष प्रसाद हिरे, स्टँडिंग फॉर टायगर फौंडेशन मेळघाटचे रवींद्र मोहोड, पोलीस निरीक्षक पुरडकर, पर्यावरण शाळेचे राजेंद्र नन्नवरे, जेष्ठ वन्यजीव अभ्यासक अभय उजागरे, भरारी फौंडेशनचे दीपक परदेशी, वन्यजीव प्रेमी नितीन जोशी हे उपस्थित होते. यावेळी वन्यजीव संवर्धनासाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल दीपक परदेशी आणि आरोग्य दूत अरविंद देशमुख यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

सातपुड्यातील वाघ आणि वन्यजीव वाचवावे, या उद्देशाने वन्यजीव संरक्षण संस्था गेली १२ वर्षांपासून प्रयत्नशील असून या लोकसहभाग आणि जनजागृती या दोन प्रमुख मुद्यांवर अधिक भर देण्यात संस्थेचा पुढाकार असतो. उत्तर महाराष्ट्रात फक्त जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक पट्टेदार वाघ असून त्यांच्या संवर्धनासाठी संस्थेने पुढाकार घेतला आहे.

मान्यवरांच्या मार्गदर्शना नंतर रॅली शहरातून स्टेडियम कॉम्प्लेक्स, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, स्टेशन रोड, टॉवर चौक या भागात मानवी वाघांचा सहभाग असलेले पथनाट्य सादरीकरण करत सदर रॅली निघाली.आता दोन दिवस नशिराबाद, भुसावळ, वेल्हाळे, वरणगाव, मुक्ताईनगर, डोलारखेडा, चारठाणा, रावेर, खिरोदा, पाल आणि त्या परिसरातील मिळून अश्या २५ गावात पथनाट्य, सादर करत जनजागृती करीत आहेत. सदर रॅलीत जळगांव, धुळे, शिरपूर, मेळघाट, मुंबई, नासिक येथून सुमारे १५० व्याघ्र दूतांनी सहभाग घेतला आहे, असे रॅलीचे संयोजक बाळकृष्ण देवरे यांनी संगितले.

सदर रॅलीचे नियोजन प्रमुख रविंद्र सोनवणे, वासुदेव वाढे, निलेश ढाके, गौरव शिंदे, यांनी जबाबदारी घेतली आहे, रॅली मध्ये विशेष आकर्षण मानवी वाघ म्हणून अॅलेक्स प्रेसडी धीरज शेकोकारे, प्रथमेश सैन्दाणे भूमिका बजावत आहेत, जगदीश बैरागी, राजेश सोनवने ,प्रसाद सोनवणे, अजीम काझी, शुभम पवार, बबलू शिंदे, सुरेंद्र नारखेडे, हेमराज सोनवणे, अमोल देशमुख, पुंडलिक पाटील, चेतन भावसार, दिनेश सपकाळे, योगेश सपकाळे, अभिषेक ठाकूर, अरुण सपकाळे, जयेश पाटील, प्रल्हाद पाटील, विनोद सोनवणे, प्रदीप शेळके, भूषण चौधरी, श्याम पाटील, गौरव शिंपी, ऋषीकेश पाटिल, वैभव पाटील, बंडू भोई, ऋषी महाले, परिश्रम घेत आहेत.

Protected Content