कारच्या धडकेत दुचाकीवरील महिला व लहान मुले जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील रामदेववाडी गावानजीक भरधाव कारने दुचाकीला मागून दिलेल्या धडकेत महिलेसह दोन लहान मुले गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी २१ मे रोजी दुपारी १२ वाजता घडली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील रायपूर कुसुंबा येथील रहिवाशी विकास बाबुलाल चव्हाण (वय-२४) हे आपल्या पत्नी व दोन मुलांसह वास्तव्याला आहे. रविवारी २१ मे रोजी दुपारी १२ वाजेच्या एरंडोल तालुक्यातील खडका येथून रायपूर कुसुंबा येथे दुचाकी (एमएच १९ डीजी ६०३०) ने जात असतांना जळगाव तालुक्यातील रामदेववाडी गावानजीक मागून भरधाव वेगाने येणारी कारने जोरदार धडक दिली. या धडकेत विकास चव्हाण यांची पत्नी व दोन्ही मुले रोडच्या खाली पडले. तर वाहनाचे नुकसान झाले. अपघात घडल्यानंतर अज्ञात कारचालक हा चारचाकी वाहन घेवून पसार झाला. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात विकास चव्हाण यांनी धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक स्वप्निल पाटील करीत आहे.

Protected Content