निंबोल नांदुरखेडा गावा नजीकचे शेती-शिव रस्ते मोकळे

 

रावेर, प्रतिनिधी । महसूल प्रशासनातर्फे महाराजस्व अभियाना अंतगर्त आज निंबोल नांदुरखेडा गावा नजिकचे शेती-शिव रस्ते तहसीलदार उषाराणी देवगुणे निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांच्या उपस्थित येथील शिव रस्ते मोकळे करण्याची कारवाई सुरु झाली आहे.यामुळे या परीसरातील शेतक-यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

या बाबत वृत्त असे की निंबोल व नांदुरखेडा या गावांच्या शेतक-यांनी शिव रस्ते मोकळे करण्यासाठी अर्ज केला होता.त्याची दखल घेत महाराजस्व अभियाना अंतर्गत आज तहसीलदार सौ उषाराणी देवगुणे व निवासी नायब तहसीलदार संजय तायडे स्पॉटवर जाऊन लोकसह भागतून आज निंबोल-नांदूरखेडा शिवरस्ते मोकळे करण्याची करवाई सुरु झाली यावेळी महसूल प्रशासनाचे मंडळ अधिकारी टोंगळे तलाठी किर्ती कदम, निलेश चौधरी अव्वल कारकुन मनोज लडके लिपिक प्रविण पाटील यांची देखील उपस्थिती होती.

या शेतक-यांची होती उपस्थिती

यावेळी संजय महाजन,कडू पाटील,चंद्रकांत पाटील,भागवत पाटील,प्रभाकर पाटील, गोपाळ पाटील, संजय पाटील, दत्तू पाटील, विजय पाटील यांच्या सह निंबोल व नांदूरखेडा येथील शिव रस्त्याला शेती असलेले शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते.

…आणि तहसीलदार निघाल्या पायी

दरम्यान नांदुरखेडा व निंबोल शेती शिव रस्ता मोकळा करण्यासाठी रावेर तहसीलदार स्पॉट वर पोहचल्या नंतर संपूर्ण रस्ता बघण्यासाठी दोन्ही बाजूच्या शेतक-यांच्या समस्या ऐकुन तब्बल तीन किमी उषाराणी देवगुणे पायी चालत गेल्या व संपूर्ण रस्ता बघुन शेतक-यांचे समन्वय घडून लोक सहभागातून मोकळा करण्याची कारवाई सुरु झाली अनेक वर्षा पासून प्रलंबित शेतीशिव रस्ता मोकळा होतांना बघुन शेतकर-यांमध्ये समाधानाचे वातावरण होते.

Protected Content