महामार्गावर भीषण अपघात : दोन तरूण ठार

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात दोन तरूणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे.

काल रात्री ११ वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात अरफाज मोहम्मद इम्तियाज कासीम (२२, रा.आझाद मार्केट, खडका रोड, भुसावळ) आणि विष्णू गोविंद कारमुंगे (२२, गरूड प्लॉट, भुसावळ) या दोन तरूणांचा मृत्यू झाला आहे. हे दोन्ही तरूण एकमेकांचे मित्र असून ते एम.एच.१९ सी.टी.८५७२ या क्रमांकाच्या दुचाकीवरून जात होते.

दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील मुन्ना तेली यांच्या पेट्रोल पंपासमोर डंपरला पाठीमागून धडक दिल्याने दोघे मित्र जबर जखमी झाले. या दोघांना रुग्णालयात हलवण्यात आले मात्र याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली. मयत अरफाज हा न्यूज-१८ लोकमतचे पत्रकार मो.इम्तियाज यांचा मुलगा आहे. दोन्ही मयत तरूणांवर आज अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघातामुळे दोन्ही कुटुंबावर वज्राघात झाला असून परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Protected Content