सागर पार्क हडप करण्यासाठी १०० कोटींची सुपारी – आ. राजूमामा भोळेंचा आरोप ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । शहरातील सागर पार्कची जागा आरक्षणातून वगळण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने १०० कोटी रूपयांची सुपारी घेतल्याचा सनसनाटी आरोप आज भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केला.

वॉटरग्रेस प्रकरणी आमदार गिरीश महाजन यांचे प्रसारमाध्यमांमध्ये नाव घेतले जात असल्याबद्दल आज भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेला आमदार राजूमामा भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महापौर भारती सोनवणे, ज्येष्ठ नगरसेवक कैलास सोनवणे व विशाल त्रिपाठी यांची उपस्थिती होती. या पत्रकार परिषदेत आमदार राजूमामा भोळे यांनी वॉटरग्रेस प्रकरणी कुणालाही पाठीशी घातले जाणार नसल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान, पत्रकार परिषदेत आमदार राजूमामा भोळे म्हणाले की, शहरातील सागरपार्कची जागा हडप करण्यासाठी १०० कोटी रूपयांची सुपारी देण्यात आलेली आहे. ही सुपारी महाविकास आघाडी सरकारतर्फे देण्यात आली असून ही जागा आरक्षणातून वगळण्यात यावी यासाठी जोरदार प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत. सुप्रीम कोर्टाने ही जागा महापालिकेच्या मालकीचे असल्याचे स्पष्ट केले असले तरीही हा प्रकार होत आहे. एक वकील आणि एक महिला हे आयुक्तांवर यासाठी दबाव आणत असल्याचा गौप्यस्फोट सुध्दा राजूमामा भोळे यांनी केला.

यासोबत कोल्हे यांच्या भूखंडाच्या प्रकरणात लाठी वकिलांनी कमिशन घेतले असल्याचा आरोप राजूमामा भोळे यांनी याप्रसंगी केला. राठी वकिलांची नार्को टेस्ट करण्याची मागणी सुध्दा त्यांनी केली. तर आता सुध्दा सागर पार्कच्या जागेसाठी १०० कोटी रूपयांची मागणी करण्यात येत आहे. वॉटरग्रेस प्रकरणी अनेक गावगप्पा सुरू असतांना हे प्रकरण त्यापेक्षा किती तरी पटीने मोठे असल्याचे राजूमामा भोळे यांनी स्पष्ट केले.

खालील व्हिडीओत पहा आमदार राजूमामा भोळे नेमके काय म्हणालेत ते ?

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/382141659534435

Protected Content