जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मराठा प्रिमीयर लीगचे संस्थापक अध्यक्ष तथा मराठा समाजातील सर्व उपक्रमांमध्ये हिरीरीने पुढे असणारे दिवंगत हिरेश कदम यांना सागर पार्कवर भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. सामाजिक कार्यातील त्यांच्या कामगिरीचे स्मरण करतांना अनेकांना गहिवरून आले.
उद्योजक हिरेश कदम यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाल्याने समाजावर शोककळा पसरली आहे. त्यांना सागर पार्कवर सुरू असलेल्या मराठा प्रिमीयर लीगमध्ये श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करून मराठा समाजासाठी त्यांनी केलेल्या कार्याचे कृतज्ञतापूर्वक स्मरण केले.
या वेळी खासदार उन्मेष पाटील, आमदार राजूमामा भोळे, उपमहापौर कुलभूषण पाटील, राष्ट्रवादीचे निरीक्षक करण खलाटे, उद्योजक प्रा. डी. डी. बच्छाव, प्रमोद पाटील, श्रीराम पाटील, डॉ. राजेश पाटील, मनोज पाटील, प्रतिभा शिंदे, सुरेश पाटील, चंदन कोल्हे, चंद्रशेखर पाटील, उमविचे माजी कुलसचिव संभाजी देसाई, प्रा. आर. व्ही. पाटील, उमेश कदम, रंगकर्मी शंभू पाटील, विजय मराठे, सुरेंद्र पाटील, राम पवार आदी मान्यवर उपस्थित होते.