अज्ञात वाहनाच्या धडकेत शेतकर्‍याचा मृत्यू; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव, प्रतिनिधी | जळगाव-पाचोरा रोडवर पायी जात असलेल्या भिका कडू महाजन रा. टाकरखेडा ता. यावल यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना २ डिसेंबर रोजी घडली होती. याप्रकरणी शुक्रवार ७ जानेवारी रोजी सायंकाळी अज्ञात चालकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, जळगाव पाचोरा रोडवर पन्नालाल लाडवंजारी यांचे शेतासमोर रस्त्यावर भिका कडू महाजन रा. टाकरखेडा ता. यावल हे २ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास रस्त्याने पायी जात होते. यादरम्यान आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. यात भिका महाजन यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी संताजी पंडीत लाडवंजारी वय ४६ रा. मेहरुण जळगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शुक्रवारी ७ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता अज्ञात वाहनचालकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक अमोल मोरे हे करीत आहेत.

Protected Content