जळगाव प्रतिनिधी । महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेत संलग्न असलेल्या आठ खासगी कोविड रुग्णालयांनी नियमांचा भंग केल्याने त्यांना जिल्हा शल्य चिकित्सकांनी नोटीसा बजावल्या आहेत.
महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेत कोविडचे उपचार मोफत करण्यात येतात. तथापि. या योजनेशी संलग्न असलेल्या आठ खासगी कोविड रुग्णालयांनी कोविड रुग्णांवर योजनेचा लाभ न देता इतर रुग्णांप्रमाणे बिल आकारले. अर्थात, नियमाचा भंग केल्याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सकांनी आठ रुग्णालयांना नोटीस बजावली. त्यात जळगाव शहरातील तीन, चाळीसगाव येथील दोन तर जामनेर, चोपडा, पाचोरा येथील प्रत्येकी एका रुग्णालयाचा समावेश आहे.
सिव्हील सर्जन यांनी नोटीस बजावलेल्या रूग्णालयांमध्ये ऑर्किड हॉस्पिटल, महाजन हॉस्पिटल, अश्विनी हॉस्पिटल (जळगाव), बापजी जीवनदीप हॉस्पिटल व कृष्णा क्रिटीकल (चाळीसगाव), जीएम हॉस्पिटल (जामनेर), विघ्नहर्ता हॉस्पिटल (पाचोरा), श्री नृसिंह हॉस्पिटल (चोपडा) यांचा समावेश आहे. यामुळे आरोग्य क्षेत्रात खळबळ उडाली आहे.