फैजपूर येथे सुरू होणार लसीकरण !

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । येथील नगरपालिकेतील पदाधिकार्‍यांनी शहरात लसीकरण सुरू व्हावा यासाठी आ. शिरीष चौधरी यांच्याकडे केलेली मागणी मान्य करण्यात आली असून येथे लवकरच लसीकरण केंद्र सुरू होणार आहे.

याबाबत वृत्त असे की, फैजपूर शहरात लसीकरण सुरू व्हावे यासाठी १ मे रोजी पालिका नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवक यांनी आमदार शिरीष चौधरी यांच्याकडे लसीकरण सुरू व्हावे म्हणून मागणी केली होती. या मागणीचा पाठपुरावा आमदारांनी केल्याने दोन दिवसात शहरात लसीकरण सुरू होणार असल्याचे पत्र जिल्हा शल्य चिकित्सक चव्हाण यांनी पालिकेला प्राप्त केले आहे.

नगराध्यक्ष महानंदा होले, उपनगराध्यक्ष नयना चौधरी, गटनेते मिलिंद वाघूळदे, शेख कलीम खान मनियार, शेख कुर्बान मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांच्यासह सर्व नगरसेवक यांनी ही मागणी केली होती या नंतर आमदार चौधरी यांनी लसीकरण लवकर सुरू करावी यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोजीराव चव्हाण यांच्याकडे तात्काळ भ्रमणध्वनीवर द्वारे चर्चा केली व फैजपूर शहर व परिसरात नागरिकांना लसीकरणासाठी सोय करावी अशी मागणी केली यासाठी पालिका रुग्णालयात पुरेसे डॉक्टर व स्टॉफ नसल्याने जिल्हा स्तरावर स्टॉप उपलब्ध करावा अशा सूचना दिल्या

दरम्यान जिल्हा शल्यचिकित्सकांकडे स्टॉफ उपलब्ध नसल्याने आमदारांनी शहरातील आशीर्वाद हॉस्पिटल चे संचालक डॉ शैलेश खाचणे यांच्याशी चर्चा केली व त्यांनी त्यांच्या न्हावी रोडवरील जागेसह १ डॉक्टर व २ नर्स एक ऑपरेटर देण्याची तयारी दर्शवली. यानुसार शहराच्या नागरिकांसाठी सातपुडा मुलांचे हॉस्पिटल न्हावी मार्ग येथे कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्याचे पत्र जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी नगरपालिकेला दिले असून दोन दिवसात लसीकरण सुरू करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष महानंदा होले गटनेते मिलिंद वाघुळदे,मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी दिली आहे.

तसेच, माजी नगराध्यक्ष निलेश राणे यांनी नागरिकांची होणारी गैरसोय पाहता फैजपूर शहरात लसीकरण केंद्र सुरू करावे अशी मागणी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिली होती त्या वेळी त्यांनी उपोषणाचा इशारा देखील दिला होता.

Protected Content