धरणगाव येथील ‘तो’ व्यक्ती होम क्वॉरंटाईन : तहसीलदारांचे निर्देश

धरणगाव प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील मुंगसे येथे़ जाऊन आलेल्या येथील संभाजी नगरातील व्यक्तीला तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी होम क्वॉरंटाईनचे निर्देश दिले आहेत.

याबाबत वृत्त असे की, मुंगसे (ता. अमळनेर) येथील महिला कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती काल रात्री निष्पन्न झाली होती. यामुळे प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करून मुंगसेसह परिसरातील चार गावे सील केली. तसेच या गावाच्या परिसरातील सात किलोमीटरचा भाग हा बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आला होता. यात धरणगाव येथील संभाजी नगरातील एक व्यक्ती मुंगसे येथून आपल्या घरी आल्याची माहिती आज समोर आली होती.

धरणगाव येथील संभाजी नगरात राहत असलेल्या एका इसमाची मुंगसे गावाला शेती आहे. शेतीचे कामानिमित्त त्याचे मुंगसे येथे जाणे येणे असते. काल तो मुंगसे येथे नेहमीप्रमाणे शेतीकामासाठी गेला होता. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी जागृती दाखवत ही माहिती प्रशासनाला कळविली. यानंतर त्याला धरणगाव पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले. मात्र, त्याने आपण तपासणी केलेली असल्याची माहिती पोलिसांना दिली.

दरम्यान, या प्रकरणी प्रशासकीय पातळीवरून झालेल्या दिरंगाईबाबत लाईव्ह ट्रेंडस न्यूजवर वृत्त झळकताच प्रचंड खळबळ उडाली. याची दखल घेऊन तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी संबंधीत व्यक्तीची ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक तपासणी केली. यानंतर संबंधीत व्यक्तीला १४ दिवसांपर्यंत होम क्वॉरंटाईन मध्ये राहण्याचे निर्देश देण्यात आले असून तहसीलदारांनी प्रस्तुत प्रतिनिधीला ही माहिती दिली.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content