चिकन खाल्याने कोरोना विषाणूचे संक्रमण होत नाही – पशुसंवर्धन विभाग

जळगाव प्रतिनिधी । चीनमध्ये आढळलेल्या कोरोना विषाणूच्या अनुषंगाने गेल्या काही दिवसांपासून विविध प्रकारच्या अफवा पसरत आहे. मात्र चिकन व मटण हे मांस उकडून व शिजवून खाल्ले जाते व त्या तापमानात कुठलेही विषाणू जिवंत राहू शकत नाहीत. चिकन खाल्याने कोरोना विषाणूचा प्रसार होतो अशा अफवा पसरत असून कुक्कुट पक्षी व उत्पादनांशी कोरोना विषाणूचा संबंध नाही. अशी माहिती पशुसंवर्धन विभागाच्या वतीने देण्यात आले आहे.

कुक्कुट पक्षांच्या मांसाहारामुळे कोरोनाचा प्रसार होतो अशा प्रकारच्याही अफवा पसरविल्या जात आहेत. तथापि, केंद्र सरकारच्या मत्स्यपालन, पशुपालन तथा डेअरी मंत्रालयाने १० फेब्रुवारी, २०२० रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार कोरोना हा विषाणूमुळे पसरणारा आजार आहे. कोरोना विषाणूचे संक्रमण पक्षात आढळून आलेले नाही. त्यामुळे कुक्कुट पक्षांचे मांस खाणे अपायकारक नसल्याचे त्यांनी अहवालात स्पष्ट केले आहे. आपल्याकडे चिकन व मटण हे मांस उकडून व शिजवून खाल्ले जाते व त्या तापमानात कुठलेही विषाणू जिवंत राहू शकत नाहीत. चिकन खाल्याने कोरोना विषाणूचा प्रसार होतो अशा अफवा पसरत असून कुक्कुट पक्षी व उत्पादनांशी कोरोना विषाणूचा संबंध नाही.

कुक्कुट मांस व कुक्कुट उत्पादने मानवीय आहारामध्ये वापरण्यासाठी पुर्णपणे सुरक्षित असून नागरीकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी वैयक्तीक स्वच्छतेला प्राध्यान्य द्यावे. यामध्ये वारंवार साबणाने हात धुवावेत, गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे, हस्तदोलंन टाळावेत व शंका आल्यास तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवधन उपायुक्त श्री. गायकवाड यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Protected Content