स्वाईन फ्लूच्या आजारामुळे नगरपरिषदेने डुकरांचा बंदोबस्त करावा; नागरिकांची मागणी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सध्या राज्यात सर्वत्र सुरू असलेल्या डुकरांच्या विषाणुजन्य साथीच्या आजाराने गोंधळ घातला आहे. यावल येथील नगर परिषदच्या कार्यक्षेत्रात असलेल्या विस्तारीत वसाहतीतील आयशानगर व नाल्याच्या काठीवरच्या परिसरातील विविध कॉलनी व वसाहती जवळच्या नाल्यात वारंवार डुकरांचा मृत्यु होत असल्याने हा मृत्यु डुकरांवर आलेल्या अफ्रीकन स्वाईन फ्लूमुळे तर होत नाही असा संशय नागरिकांमध्ये व्यक्त करण्यात येत आहे.
डुकरांवर आलेल्या या स्वाइन फ्लूच्या आजारामुळे नागरिकांचे व त्यांच्या कुटुंबाचे आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असुन, नगर परिषद प्रशासनाने तात्काळ या विषयाची दखल घेत डूकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे. याबाबतचे वृत्त असे की यावल नगर परिषदच्या कार्यक्षेत्रातील नवीन विस्तारित वसाहतीमधील आयशानगर, चांदनगर, पवननगर व आदी कानतोडी नाल्याच्या काठावर असलेल्या वस्तीमध्ये मागील काही दिवसांपासुन वारंवार डुकरांचा मृत्यु होत आहे. डुकरे मरण पावल्यानंतर सुटणाऱ्या दुर्गधींमुळे या ठिकाणी वास्तव्यास राहणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान नाल्यात अशा प्रकारे डुकरांच्या होणाऱ्या मृत्युमुळे त्यांचा मृत्यु हा सर्वत्र पसरलेल्या साथीच्या आजार अफ्रिकन स्वाईन फ्यु फिव्हर विषाणुजन्य तापामुळे तर होत नाहीना असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. नगर परिषदे तात्काळ या नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत अतिशय गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने मॉपींग राऊंड मोहीम राबविण्यात यावी अशी मागणी होत आहे. दरम्यान डुकरांच्या होणाऱ्या अचानक मृत्युमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. यासाठी डुकरांची पशु चिकित्सा विभागाकडून तपासणी करण्यात यावी अशी ही मागणी होत आहे.

Protected Content