हिंगोणा शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी मुक्तार शेख

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील हिंगोणा जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शेख मुक्तार शेख रशीद यांची निवड करण्यात आली आहे. 

या संदर्भात शाळेत नुकतीच वार्षिक बैठक संपन्न पार पडली असून बैठकीत शालेय समितीची निवड करण्यात आली. यावेळी अध्यक्षपदाची निवडणुक प्रक्रिया पार पडली असुन त्यामध्ये शेख मुक्तार शेख रशिद यांची मतदानाव्दारे शालेय समितीच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा निवड झाली. अध्यक्षपदाच्या निवडीकरीता ८ सदस्या पैक्की यातील अध्यक्षपदासाठी ३ जण ईच्छुक होते. यातील याकुंब खान युनूस खान यांना एक ही मत मिळाला नाही. तसेच  दुसऱ्याला ईच्छुकास ३ मते मिळाली तर शेख मुक्तार शेख रशिद यांना४ मते मिळाल्याने त्यांना सर्वाधीक मते मिळाल्याने त्यांना शालेय समितीचे अध्यक्ष देण्यात आले. या निवडीबद्दल शाळेतील मुख्यध्यापक अहमद खान यांनी उपस्थित सर्व सदस्यांचे स्वागत करून अभिनंदन केले. तर बैठकीला उपस्थितांचे आभार हाजी युसुफ जनाब यांनी मानले.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!