Home Cities अमळनेर खान्देश शिक्षण मंडळ निवडणुकीसाठी पुन्हा अनुमती मिळण्याची मागणी

खान्देश शिक्षण मंडळ निवडणुकीसाठी पुन्हा अनुमती मिळण्याची मागणी

0
180


अमळनेर प्रतिनिधी । येथील खान्देश शिक्षण मंडळाच्या त्रैवार्षिक निवडणुकीची मुदत एप्रिल महिन्यातच संपली असून पुन्हा एकदा पत्राव्दारे अनुमती मिळावी, अशी मागणी अध्यक्ष अनिल कदम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. 

दरम्यान, मुदतीत निवडणूक लावण्यासाठी अध्यक्ष अनिल कदम यांनी  जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी अनुमती मागितली होती. मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी ही अनुमती नाकारली होती. त्यामुळे श्री. कदम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आता पुन्हा एकदा पत्राद्वारे अनुमती मागितली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी अनुमती देताच निवडणूक लावण्यात येईल असे श्री. कदम यांनी सांगितले .दरम्यान कार्याध्यक्ष जितेंद्र जैन यांनीही आम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहोत, असे सांगितले.


Protected Content

Play sound