दीपनगरात स्थानिकांना रोजगार द्या, अन्यथा प्रोजेक्ट बंद ठेवा-खा. खडसे

भुसावळ प्रतिनिधी | तालुक्यातील दीपनगर येथील नवीन विद्युत केंद्रात स्थानिकांना रोजगार मिळावा, अन्यथा हा प्रोजक्ट बंद ठेवावा अशी मागणी आज खासदार रक्षाताई खडसे यांनी पत्रकार परिषदेत केली.

खासदार रक्षाताई खडसे आणि आमदार संजय सावकारे यांनी आज येथील विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. औष्णिक विद्युत केंद्र नवीन ६६० मेगा वॅट प्रकल्पात स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्नशील असून त्याबाबत वेळोवेळी दिपनगर येथील अधिकार्‍यांची बैठक घेऊन त्याबाबत पाठपुरावा केलेला असून, काही दिवसापूर्वी मुख्य मुख्य अभियंता यांना पत्र व्यवहार करून सदर प्रकल्पात जास्तीत जास्त स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणेसाठी वृत्तपत्राद्वारे जाहिरात देऊन आवश्यक योग्यतेनुसार स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे तोवर सदर प्रकल्प बंद ठेवण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे याबद्दल खासदार रक्षाताई खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.सदर प्रकल्पात स्थानिकांना रोजगार उपलब्ध होत नाही आहे.

त्यासाठी खासदार रक्षाताई खडसे व आमदार संजय सावकारे यांनी प्रकल्पातील मुख्य अधिकार्‍यांची बैठक घेऊन कंत्राटदरांची माहिती मागितली असता त्यांच्या असे निदर्शनास आले की सदर प्रकल्पात कंत्राटदारांनी पर राज्यातील जवळजवळ १२०० कंत्राटी कर्मचार्‍यांना कामावर ठेवले असून फक्त ४०० स्थानिकांना रोजगार उपलब्ध केला आहे. परंतु सदर प्रकल्पासाठी जमीन संपादित करतांना स्थानिकांना रोजगार उपलब्ध करू असे आश्वासन देण्यात आले होत, आणि सदर प्रकल्प सुरु करण्याचा मुख्य उद्देश स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा हाच होता. असे असतांना सुद्धा स्थानिकांना रोजगारापासून डावलण्यात येत आहे, तरी जास्तीत जास्त स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा यासाठी मुख्य अभियंता यांना शेवटचा इशारा देण्यात आला आहे. असे यावेळी खासदार रक्षाताई खडसे यांनी पत्रकारांना सांगितले.यावेळी तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील, शहराध्यक्ष परीक्षित बर्‍हाटे, प.स.सभापती वंदना उन्हाळे यांच्यासह स्थानिक नगरसेवक व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!