पतपेढीत अपहार केल्याप्रकरणी दोघे अटकेत

चोपडा प्रतिनिधी । येथील महावीर पतपेढीत कर्जदाराची रक्कम कर्ज खात्यात न भरता परस्पर अपहार केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात दोघांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, येथील महावीर पतपेढीत कर्जदाराची रक्कम कर्ज खात्यात न भरता परस्पर १ लाख ८ हजार ३४२ रूपयांचा अपहार केल्याप्रकरणी चोपडा शहर पोलिस ठाण्यात २३ सप्टेंबर २०२० रोजी नरेंद्र जैन व प्रवीण जैन यांच्याविरुद्ध व्यवस्थापक अचल अग्रवाल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला होता. यानंतर दोन्ही संशयितांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. यात उच्च न्यायालयामध्ये नरेंद्र जैन व प्रवीण जैन यांनी दाखल केलेला जामिन अर्ज फेटाळण्यात आला. यानंतर हे दोन्ही संशयित पोलीस स्थानकात स्वत:हून दाखल झाले.

या गुन्ह्यातील संशयित नरेंद्र चंपालाल जैन (वय ५३) व पिग्मी एजंट व लिपिक प्रवीण इंदरचंद जैन (वय ४५, दोन्ही रा. गणेश कॉलनी, चोपडा) हे १० रोजी शहर पोलिसांत स्वतःहून हजर झाले असता त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि अजित साबळे करत आहेत.

Protected Content