किरकोळ व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्याची मार्केट सदस्यांची मागणी (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । मार्केटमधील किरकोळ विक्रेत्यांना शिथीलता देवून विक्रीस परवानगी द्यावी या मागणीसाठी आज सोमवारी शासकीय अजिंठा विश्रामगृह येथे शहरातील संत कंवरराम मार्केट, केळकर मार्केट, गणेश मार्केटच्या प्रमुख पदाधिकारी यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याशी भेट घेवून चर्चा केली.

गेल्या तीन महिन्यांपासून शासनाने कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. यात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश राज्य शासनाने काढले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून किरकोळ वस्तू विक्री करणारे व्यापारी यांची दुकाने पुर्णपणे बंद आहेत. त्यामुळे आता अशा लहान व्यापारी वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे. १ जून पर्यंत जिल्हा प्रशासनाने कडकनिर्बंध लागू करून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद होती. रविवारी ३० मे रोजी सायंकाळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पुन्हा १५ दिवसांसाठी निर्बंध लागू केली आहेत. यामुळे जळगाव शहरातील फुले मार्केट, संत कंवरराम मार्केट, केळकर मार्केट, गणेश मार्केट येथील व्यापाऱ्यांनी आज सोमवारी ३१ मे रोजी सकाळी १० वाजता शासकीय अजिंठा विश्रामगृह येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेवून चर्चा केली. त्यावर पालकमंत्री म्हणाले आज सोमवारी रात्रीपर्यंत शासनाचे नियम व अटी याबाबत आल्यावरच आपल्याला जिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या हिताचा निर्णय घेवू असे आश्वासन दिले. 

याप्रसंगी फुले मार्केट संघटनेचे अध्यक्ष रमेश मतानी, संत कंवरराम मार्केट अध्यक्ष शंकर नाथानी, मनोहर नाथनी, बापू गोरानी, शंकर तलरेजा, नरेश कावडा, मोहन मतानी, नामदेव मंधान, सोमंत दारा, प्रदिप इसराणी, दिन वालेजा, दिपू मंदार, नरेश कावडा, राजा गलाणी, राजाराम कटारीया यांच्यासह आदी व्यापारी उपस्थित होते. 

Protected Content