आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्याने तणावाचे वातावरण; एकाला घेतले ताब्यात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाल्याने सोमवार १९ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास शाहू नगरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच शहर व जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.

पोलीस सूत्राने दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील शाहूनगर परिसरात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायर झाल्यामुळे शहराील शाहूनगरात सोमवारी 19 फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजता सुमारास जमाव मोठया संख्येने जमला होता. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण होत असल्याची माहिती मिळताच शहर व जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जमावाची समजूत काढून त्यांना पांगवल्यामुळे पुढील अनर्थ टळला. त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी जावून नागरिकांना शांततेसह अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन यावेळी केले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी करुन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. महेश्र्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांनी जिल्हापेठ पोलिसात धाव घेतली. याठिकाणी एका गटाकडून त्यांना निवेदन देवून संशयितावर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली होती.

Protected Content