शिवजयंती निमित्त ३५० झाडे जगवण्याचा सावता नगर मधील नागरिकांचा माणस

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगांव शहरातील सावता नगर भागातील नागरिकांनी शिवजयंती निमित्त तसेच शिवराज्याभिषेक साडेतीनशे वर्षा निमित्त सावता नगर भागातील नागरिकांनी साडेतीनशे झाडे जगवण्याचा मानस केला असून पर्यावरणाला पूरक अशी झाडे यामध्ये आहे

सध्या फरवरी म्हणजेच उन्हाचे चटके जाणव लागले असल्याने झाडे लावून झाडे जगवणे हा एक पर्यावरणाला संदेश देणारा आहे अनेक झाडांमधून आपल्याला ऑक्सिजन देखील मिळते आणि शिवजयंतीच्या अतिशय चांगला मुहूर्तावर सावता नगर भागातील नागरिकांनी एक सामाजिक संदेश देण्याचा काम या शिवजयंती मधून देण्यात आलेले आहे. शिवछत्रपती मित्र मंडळ जळगांव यांनी मंडळाच्या नावा प्रमाणे त्यांचे सामाजिक काम होणार आहे शिवजयंती निमित्त आगळावेगळा उपक्रम समाजामध्ये करण्यात आला आहे. शिवजयंती या दिवशी झाडे लावून ते पूर्ण जगवण्याची जबाबदारी देखील या नागरिकांनी घेतली आहे.त्यामुळे या भागातील नागरिकांचे कौतुक होत आहे.

शहरातील प्रसिद्ध असे असलेले अमर रगडा या सेंटरकडून झाडांच्या सुरक्षतेसाठी ट्री गार्ड देण्यात आले आहे तसेच काही नागरिकांनी पाण्याची व्यवस्था झाडांची रोपे याची जबाबदारी घेऊन पूर्ण सावता नगर परिसर हिरवागार करण्याचे उद्दिष्ट यांचे आहे.

Protected Content