समाज बांधवांच्या हितासाठी झटणारी महाराष्ट्र गवळी समाज संघटना ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । विविधतेने नटलेल्या आपल्या देशात असंख्य जाती-धर्माचे समूह एकत्रित राहत आहेत. ही विविधता प्रत्येक समूहाला काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण ओळख देत असते. एकमेकांकडे आकस ठेवून न बघता कुतूहलाने बघितले तर एकमेकांकडून आपण बरेच काही शिकू शकतो. चांगल्या विचारांचे, परंपरांचे, खाद्य संस्कृतीचे व सण-उत्सवांचे आदान-प्रदान होऊ शकते. याच भावनेतून लाईव्ह ट्रेंड्स न्यूज च्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या समाज संघटनांची माहिती आमच्या प्रेक्षक-वाचकांसमोर सादर करीत आहोत. या मालिकेत आपण आज एचा चर्चासत्राच्या माध्यमातून महाराष्ट्र गवळी समाज संघटनेची माहिती देत आहोत.

महाराष्ट्र गवळी समाज संघटनेची स्थापना, तिचे उद्दिष्ट, तिची वाटचाल, तिचे सामाजिक उपक्रम आणि तिच्या भविष्यकालीन योजना याबाबत संघटनेच्या जिल्हा पदाधिकार्‍यांनी यावेळी मनमोकळेपणाने माहिती दिली व आपली भूमिका मांडली. या चर्चासत्रात संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप गवळी, युवा तालुकाध्यक्ष संतोष जानगवळी, युवा तालुका उपाध्यक्ष अनिल उधीकर व युवा कार्यकर्ते शरद जानगवळी आदी संघटनेच्या पदाधिकार्‍यांशी संवाद साधून तिच्या वाटचालीचा मागोवा घेण्यात आला. या चर्चासत्राचे संचलन केलेय आमचे वृत्त संपादक विवेक उपासनी यांनी.

पहा : गवळी समाज संघटनेच्या पदाधिकार्‍यांशी साधलेल्या संवादाचा व्हिडीओ.

Add Comment

Protected Content