जि.प. उर्दू शिक्षकांची जाहीरात काढा; शिष्टमंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने उर्दू शिक्षकांच्या भरतीबाबत त्वरीत जाहिरात काढवी अशी मागणीचे निवेदन शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा कुडचे-पवार यांना सोमवारी ६ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता निवेदन दिले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिक्षक भरती संदर्भात शासनाकडून नुकतेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात आली. त्यानुसार पात्र उमेदवारांना पोर्टल या शिक्षक भरतीच्या वेबसाईटवर स्वप्रमाणपत्र तयार करण्याची सूचना करण्यात आली. त्यानुसार   स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी संस्थांच्या शाळांची जाहिरात सदर वेबसाईटवर १६ ऑक्टोबर २३ पासून अपलोड करण्याचे शासन आदेशानुसार आदेशित करण्यात आले. त्या आदेशानुसार अनेक शाळांनी शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती पवित्र पोर्टलवर अपलोड केलेली आहे. पण अद्याप जिल्हा परिषद जळगाव येथे सुमारे २५२  शिक्षकांच्या रिक्त जागांची माहिती पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली नाही.

याप्रसंगी निवेदन देतांना  जिल्हा मन्यार बिरादरीचे फारुक़ शेख, कुल जमातीचे सय्यद चांद, वरिष्ठ पत्रकार व शिक्षक अंजुम रीझवी, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष मज़हर पठाण, एमआयएमचे अध्यक्ष अहमद, सेवानिवृत्त शिक्षक साबीर इमदाद, काँग्रेस पक्षाचे बाबा देशमुख, शिकलगर बिरादरी अनवर खान, एंजल फूडचे दानियाल शेख व राजा मिर्झा आदी उपस्थित होते.

Protected Content