पत्रकार नुरुद्दीन मुल्ला यांना डॉ . बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार

कासोदा ता.एरंडोल : प्रतिनिधी । येथील सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार नुरुद्दीन मुल्ला यांना औरंगाबाद येथील शब्दगंध समूह प्रकाशन तथा ग्रंथमित्र युवा मंडळाच्या वतीने डॉ .बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नुरुद्दिन मुल्ला हेच होते त्यांना उद्घाटन व पुस्तक प्रकाशन करण्याचाही बहुमान मिळाला .

सूत्रसंचालन संदीप भदाणे व प्रास्ताविक संदीप त्रिभुवन यांनी केले .याप्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण राष्ट्रीय पुरस्कार , महात्मा फुले आदर्श शिक्षक राष्ट्रीय पुरस्कार , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्काराने विविध क्षेत्रातील महाराष्ट्रातील गुणवंतांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले .जळगाव जिल्ह्यातील शेख जावेद (यावल ),शेख ऐनुद्दीन ( धरणगाव ), आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशनचे जितेंद्र केवलसिंग पाटील (कल्याण ) शिरपूर व शेख असिफ खाटीक ( धुळे ) यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश होता .

नुरुद्दीन मुल्ला म्हणाले की, ” मला आज पर्यंत 24 पुरस्कार मिळाले आहे त्यात ए.पी .जे .अब्दुल कलाम, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू ,वल्लभ भाई पटेल , अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र गौरव पुरस्कार व उत्कृष्ट समाजसेवक , उत्कृष्ट पत्रकार असे पुरस्कार मिळाले आहे परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने पुरस्कार मिळावा अशी माझी इच्छा होती ती आज २५ वा पुरस्कार मिळाल्याने माझी सर्वार्थाने इच्छापूर्ती झाली . आभार प्रदर्शन संगीता दाभाडे यांनी केले .

 

Protected Content