विजय लुल्हे यांना महाराष्ट्र भूषण प्रेरणा पुरस्कार जाहीर

 

जळगाव :प्रतिनिधी । । तरसोद येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे उपक्रमशील शिक्षक तथा निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ जिल्हा सहसचिव विजय लुल्हे यांना वनश्री पुरस्कार प्राप्त धुळे येथील निसर्ग मित्र समितीने महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला आहे .

हा पुरस्कार टेंबे ग्रामपंचायत ( ता- बागलाण ) यांच्या तर्फे आयोजित राज्यस्तरीय पर्यावरण परिषदेत दि २० डिसेंबररोजी मालेगाव येथे दिला जाणार आहे . जलदुत डॉ तुषार शेवाळे ( मराठा विद्या प्रसारक समाज संस्था अध्यक्ष ) यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद होणार आहे . विजय लुल्हे यांना डॉ प्रतापराव दिघावकर ( वरिष्ठ पोलीस महानिरीक्षक नाशिक विभाग ) यांच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे .

या परिषदेचे उद्घाटक आमदार डॉ.सुधीर तांबे ( नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ ) असून शिक्षक आमदार किशोर दराडे (नाशिक), अर्जुन निकम (संचालक नेहरू युवा केंद्र कर्नाटक ) ज्येष्ठ कवी सुभाष सोनवणे ( नगर ) हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत .

विजय लुल्हे यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन समितीने निवड केली आहे . विजय लुल्हे यांना यापूर्वी दोन रौप्यपदके, सहा राज्य पुरस्कार व सहा जिल्हा पुरस्कारांसह अन्य पुरस्कारही प्राप्त झाले आहेत . लुल्हेंना जळगाव पर्यावरण शाळेने ” वसुंधरा हरित शिक्षक पुरस्कार ” देऊन सन्मानित केले आहे . नेशन बिल्डर अवार्ड , शतकवीर पुरस्कारानेही गौरव झाला आहे. आता हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, दिशा स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक वासुदेव पाटील, कला शिक्षक सुनिल दाभाडे, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदुषण निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष नाना पाटील, कार्याध्यक्ष डॉ. जगदिश पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे .

Protected Content