तर आम्ही ‘ती’ दुकाने फोडणार – खासदार इम्तियाज जलील यांचा इशारा

औरंगाबाद, वृत्तसंस्था | सरकारने वाईनची दुकान उघडून दाखवावी आम्ही ती फोडणार असे राज्य सरकारला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी थेट आव्हान दिले आहे. ते औरंगाबादच्या सुभेदारी विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

किराणा दुकान आणि सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला ठाकरे सरकारने नुकतीच परवानगी दिली आहे. याबाबत खासदार इम्तियाज जलील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ते पुढे म्हणाले की, आमची स्पष्ट भूमिका आहे की, सरकारने वाईनची दुकान उघडून दाखवावी आम्ही ती फोडणार, कारण समाजात एक नवीन प्रथा निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात जर असे होत असेल तर यापेक्षा वाईट गोष्ट काय असू शकते. त्यामुळे आम्ही हे खपवून घेणार नाही. त्यामुळे जर तुम्ही वाईन दुकान उघडण्याचा निर्णय घेतला असेल तर आम्ही सुद्धा फोडण्याचा निर्णय घेतला असल्याचं जलील म्हणाले.

Protected Content