जामनेर-बोदवड रोडवर तरूणाचा आढळला मृतदेह; घातपातची शक्यता

जामनेर प्रतिनिधी । शहरपासून जवळ असलेल्या बोदवड रस्त्यावरील पुलाखाली २० वर्षीय तरूणाचा मृतदेह आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. तरूणाचा घातपात झाला असावा असा संशय नातेवाईकांकडून केला आहे.

याबाबत माहिती अशी की, जामनेर-बोदवड रस्त्यावरील पुलाच्या खाली एका अनोळखी मुलाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती बोदवड पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेवून पंचनामा करून मृतदेह जामनेर उपजिल्हा ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ निकम यांनी मयत घोषीत केले.

बोदवड पोलीसांनी याबाबत अधिक चौकशी केली असता शुभम नंदू माळी (वय-२०) रा. दत्तनगर बोदवड असे मयत तरूणाचे नाव असल्याचे ओळख पटली.  ही घटनेची माहिती मिळताच शुभमची आई व नातेवाईकांनी धाव घेतली. मुलाचा मृतदेह पाहून एक आक्रोश केला होता. शुभमचा घातपात झाल्याचा संशय आई व नातेवाईकांनी केला आहे. शुभम नंदू माळी हा तरुण बदलीवर पालेभाज्या घेऊन जाणाऱ्या चार चाकी वाहनावर जात असायचा अशी माहिती नातेवाईकांनी दिली. याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात जामनेर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. टनेबाबत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निकम यांनी दिलेल्या खबरी वरून जामनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील चौकशी सुरू आहे.

Protected Content