अवैध वाळू वाहतुकीचा ट्रॅक्टर पकडला

 

रावेर : प्रतिनिधी | – रावेर शहरातुन अवैध वाळू वाहतुक करणारे ट्रँक्टर-टॉली पोलिसांनी पकडले असून रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

.एक आरोपी अटकेत देखिल आहे.अवैध वाळूवर कारवाई धडाका सुरुच आहे.तब्बल २ लाख २८ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

रावेर शहरातील उटखेडा रोडवर जमजम अँक्वाँ सेटर समोर दुपारी एमपी 68 ए 2566 स्वराज्य कंपनीचे निळ्या रंगाचे ट्रँक्टर तीन हजार रुपये किमतीची एक ब्रास वाळु अवैध पध्दतीने वाहतुक करत असतांना रावेर पोलिसांनी पकडले रावेर पोलिसात भादवि कलम 379 व गौन खनिज कायदा कलम 48 प्रमाणे पो कॉ सुरेश मेढे यांच्या फिर्यादी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. टॅक्टर-टॉली जप्त असून आरोपी अटकेत आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे व पो.ना. महेंद्र सुरवाडे हे करीत आहेत

Protected Content