‘जाणता राजा’ महानाट्याला सलग दुसऱ्या दिवशीही मोठा प्रतिसाद

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |  आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी त्यांच्या जीवनावर आधारित ” जाणता राजा ” हे महानाटय पाहण्यासाठी शिवप्रेमींनी गर्दी केली. राज्य शासनाच्या वतीने शिवराज्याभिषेकाचे 350 वे वर्ष म्हणून राज्यात आपण 350 “जाणता राजा ” या महानाट्याचे प्रयोग घेत आहोत. हे महानाटय म्हणजे महाराजांचा जीवंत दरबार वाटावा एवढं सुंदर हे 150 कलाकार साकारतात. असे गौरवोद्गार राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी या महानाट्याला शुभेच्छा देताना काढले.

आजच्या प्रयोगाला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची उपस्थिती होती.
“जाणता राजा ” हे महानाट्य काल पासून पोलीस कवायत मैदानावर सूरु असून काल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उदघाट्न झाले होते. कालही शिवप्रेमीनी उदंड प्रतिसाद दिला होता. आजही मोठा प्रतिसाद शिवप्रेमीकडून मिळाला. आज शहरात जागोजागी शिवजयंती उत्साहात साजरी करून शिवप्रेमीनी या महानाट्याला उत्साहवर्धक प्रतिसाद दिला.

उद्या ” जाणता राजा ” या महानाट्याचा शेवटचा दिवस असून ज्यांनी अद्यापही ह्या मंचावर हा रोमहर्षक अनुभव घेतला नाही त्यांनी यावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Protected Content