जामनेरात छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन

0
33
sambhaji maharaj jayanti jamner


sambhaji maharaj jayanti jamner

जामनेर प्रतिनिधी । येथे आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना प्रतिमा पूजन करून सामूहिक अभिवादन करण्यात आले.

छत्रपती युवराज संभाजी महाराज यांची ३६२ जयंती जामनेर शहरात संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ यांच्या वतीने साजरी करण्यात आली. नगर परिषदेसमोरील राजमाता जिजाऊ चौकात जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. गिरीश महाजन यांनी प्रतिमा पुजन केले. याप्रसंगी जा.ता.ए.सो.चे सचिव जितू पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, नगर परिषद गटनेते डॉक्टर प्रशांत भोंडे, नगरसेवक शरद पाटील, उल्हास पाटिल, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर पाटील, शहराध्यक्ष जावेद मुल्लाजी, जितेश पाटिल, राष्ट्रवादी डॉक्टर सेल अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पाटिल, डॉक्टर नंदलाल पाटिल, काँग्रेस कार्याध्यक्ष शंकर राजपूत, तालुकाध्यक्ष शरद त्रंबक पाटिल ,संभाजी ब्रिगेड जिल्हा सचिव अमोल पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रदिप गायके, शहराध्यक्ष विशाल पाटिल, मराठा सेवा संघाचे डॉक्टर बाजीराव पाटिल, योगेश पाटिल, विनोद पाटिल, मनीष पाटील, अतुल सोनवणे, मंगेश नखोले रमाकांत पाटिल, बादशाह धनगर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here