तमाशात गोंधळ घालणार्‍यांची आठ वर्षानंतर निर्दोष मुक्तता

पाचोरा प्रतिनीधी | आठ वर्षांपूर्वी तालुक्यातील शिंदाड येथे याञेनिमित्त झालेल्या तमाशात घातल्या प्रकरणी गावातील १६ जणांविरुध्द गुन्हा नोंदवण्यात आला होता. या प्रकरणी पाचोरा न्यायालयाने निकाल दिला असून सर्व आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले आहे.

तालुक्यातील शिंदाड येथे डिसेंबर महिन्यात ‘गैबानशा बाबा’ यांच्या ‘उरूस’निमित्त याञेचे आयोजन गेल्या अनेक वर्षापासून केले जात आहे. याञेनिमित्त करमणुकीसाठी तमाशाचा कार्यक्रम होत असतो. सन २०१२ मध्ये असाच तमाशाचा कार्यक्रम सुरू असतांना काही नागरिकांनी गोंधळ घालून तमाशा कलावंत स्त्री, पुरुषांना मारहाण केली म्हणून पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस स्टेशनमध्ये प्यारेलाल वाघ यांच्या तक्रारीवरून १६ जणांविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला होता.

सन २०१५ पासून हे प्रकरण पाचोरा न्यायालयात न्यायमूर्ती एफ. के. सिद्दीकी न्यायालयात चौकशीला होते. यात फिर्यादी पक्षातर्फे फिर्यादी व घटनेतील साक्षीदार महिला कलावंत यांचे जाब जबाब झाले. आरोपींतर्फे अॅड. अभय शरद पाटील व अॅड दिपक पाटील यांनी काम पहिले. तर सरकार पक्षातर्फे अॅड माने यांनी काम पहिले. उभय पक्षातर्फे आपली बाजू मांडल्यानंतर न्यायमूर्ती यांनी दि. १८ जानेवारी रोजी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

Protected Content