“नाना पटोले यांना अटक करा” – धरणगाव भाजप पदाधिकाऱ्यांचे पोलीस निरीक्षकांना निवेदन

धरणगाव प्रतिनिधी | राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर फौजदारी गुन्हा तातडीने दाखल करून अटक करण्यात यावी” अशा मागणीचे निवेदन धरणगाव भाजप पदाधिकाऱ्यांनी धरणगाव पोलीस निरीक्षक यांना दिले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा जिल्ह्यातील एका प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बदनामीकारक व धमकी देणारे वक्तव्य केले. अशा प्रकारे धमकी व बदनामी करणाऱ्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले याचा भारतीय जनता पार्टीच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात येत आहे. असे बेताल वक्तव्य करणारे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर फौजदारी गुन्हा तातडीने दाखल करून अटक करण्यात यावी” अशा मागणीचे निवेदन धरणगाव भाजप पदाधिकाऱ्यांनी धरणगाव पोलीस निरीक्षक यांना दिले.

जेष्ठ नेते शिरिष बयास, ओबीसी जिल्हाध्यक्ष अँड.संजय महाजन, अँड.वसंतराव भोलाने, पुनीलाल महाजन, प्रकाश सोनवणे, ओबीसी तालुकाध्यक्ष सुनिल चौधरी, ता.सरचिटणीस सुनिल पाटील, शहराध्यक्ष दिलीप महाजन, गटनेते कैलास माळी, नगरसेवक शरद धनगर, कडू बयास, कन्हैया रायपूरकर, वासुदेव महाजन, राजू महाजन, जुलाल भोई, अनिल महाजन, विजय महाजन, सचिन पाटील, निलेश महाजन, दुर्योधन सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती.

Protected Content