तरूणाचा खून करणाऱ्यांना अटक करा; नातेवाईकांचे पोलीस प्रशासनाला निवेदन (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । जुन्या पैश्यांच्या मध्यस्थीच्या वादातून झालेल्या हाणामारीत साकेगाव ता. भुसावळ येथील तरूणाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गुन्ह्यातील संशयित आरोपींना अटक करावी या मागणीसाठी आज अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांची भेट घेवून निवेदन देण्यात आले.

सविस्तर माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे १३ जून रोजी अठरा वर्षांपुर्वी पैश्यांच्या व्यवहारात मध्यस्थित असलेल्या व्यक्तीला पैश्यांचा जाब विचारण्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाली होती. पहिल्या गटातील महेश सारंगर पाटील, जयेश सारंगधर पाटील, मयूर सारंगधर पाटील यांच्यासह इतरांनी दुसऱ्या गटातील सुभाष शामराव कोळी, राहूल राजेद्र सपकाळे, विशाल सुभाष कोळी, राहूल सांतोष कोळी व निलेश बळीराम सोनवणे सर्व रा. साकेगाव ता. भुसावळ यांना बेदम मारहाण केली होती. याबाबत भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गु.रं.नं १०३/२०२१ प्रमाणे परस्परविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. यातील गंभीर जखमी निलेश बळीराम सोनवणे याला खासगी रूग्णालयात दाखल केले होते. दरम्यान निलेशचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूची वार्ता कळताच नातेवाईक संतप्त झाले. गुन्हे दाखल होवूनही अद्याप संशयित आरोपींना अटक केलेली नाही. आज जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह आणण्यात आला असून संशयित आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे. 

 

दरम्यान मयत निलेश सोनवणे यांच्या नातेवाईकांनी जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात भेट देवून अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांना संशयित आरोपींना अटक करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे. अटक न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नातेवाईक उपोषणाला बसणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. या निवेदनावर अनिता सोनवणे, ललित सोनवणे, बळीराम सोनवणे, वर्षा सोनवणे, यामिनी सोनवणे, जगन्नाथ सोनवणे, मयुर सोनवणे, एकनाथ सोनवणे, तुषार सोनवणे, अर्जून सोनवणे, योगेश सोनवणे, सुरेश कोळी, रमेश काळी, मधुकर कोळी, किशोर कोळी, कैलास कोळी, पवन मोरे, मुकेश सानवणे, नामदेव सपकाळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Protected Content