यावल येथे अंगणवाडी सेविकांना मोबाईल वाटप (व्हीडीओ )

305aa2db e66c 45c8 88fa 3187603e7a3b

यावल( प्रतिनिधी) येथील महीला व बालविकास एकात्मिक विभागाच्या माध्यमातून आज यावल येथे सर्व अंगणवाडी सेविकांना मोबाईल वाटप करण्यात आले. राज्य शासनाच्या माध्यमातून अंगणवाडी विभागाचे कार्य अधिक पारदर्शी व पेपरलेस करण्याच्या दृष्टीने शासनाचे हे मोठे पाऊल असल्याचे मानले जात आहे.

 

यावल येथील महीला व बालविकास एकात्मिक विभागाच्या कार्यालयात आज दिनांक १६ मे रोजी सकाळी १० वाजता संपन्न झालेल्या कार्यक्रमात यावल तालुक्यातील सुमारे २५५ अंगणवाडी सेविकांना आय. सी.डी. एस. कार्यालयाच्या पर्यवेक्षीका पुनम धंनजय ठाकरे व संजना वडमारे यांच्या हस्ते शासनाच्या योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या मोबाईलचे वितरण करण्यात आले. या वेळी अर्चना आठावले, कल्पना भंगाळे, कल्पना तायडे, संध्या रोझोदेकर, अलका अनिल कुरकुरे यांच्या सह पोषण आहार चळवळी प्रशांत पाटील प्रसंगी कार्यक्रमात उपस्थित होते.

 

यावेळी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना पर्यवेक्षीका यांनी सांगीतले की, या व्हॉटसअॅपच्या सेवेमुळे तालूक्यातील सर्व अंगणवाडी सेविकांशी तात्काळ समस्यांच्या अडचणी तसेच शासकीय कार्यालयीन कामाला संगणकीय प्रणालीशी जोडून आधिक गतीमान व पारदर्शी करण्याचे शासनाचा दृष्टीकोण आहे. मोबाईलमुळे कार्यालयीन कामाचे अधिक बळकटीकरण होऊन पर्यवेक्षीका आणि अंगणवाडी सेविकांमध्ये समन्यव्याचे नवे मार्ग निर्माण होतील. एकंदरीत येणाऱ्या काळात शासकीय कार्यालय हे संगणकीय प्रणालीच्या युगात जात असून भविष्यात कार्यालयीन कामकाज हे पेपरलेस होतील, असेही त्या म्हणाल्या. यावेळी तालुक्यातील सर्व २५५ आंगनवाडी सेविकांना उद्या या मोबाईला कार्यालयीन वापरण्यासंदर्भात तांत्रिक व संगणकीय मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

Add Comment

Protected Content