स्वाध्याय परिवाराचे डॉ. श्रीनिवास तळवलकर यांचे निधन

 

ठाणेः वृत्तसंस्था । स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले यांचे जावई डॉ. श्रीनिवास नीळकंठ तळवलकर यांचं मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झालं. ते ७२ वर्षांचे होते.

श्रीनिवास तळवलकर हे स्वाध्याय परिवाराच्या प्रमुख धनश्री तळवलकर (दीदी) यांचे यजमान होते. स्वाध्याय परिवाराचे काम सांभाळत असताना त्यांनी मोलाची साथ दिली होती. स्वाध्याय कार्यातील त्यांचं योगदान मोठं होतं. स्वाध्याय परिवारात त्यांना रावसाहेब म्हणून ओळखलं जायचं. श्रीनिवास तळवलकर यांच्या अचानक जाण्यानं संपूर्ण स्वाध्याय परिवारावर शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर ठाण्यातील तत्वज्ञान विद्यापीठात अंत्यसंस्कार करण्यात येणार , अशी माहिती स्वाध्याय परिवाराकडून देण्यात आली होती .

 

मुंबईमधील रहेजा हॉस्पिटलचे प्रमुख प्रवर्तक असलेले डॉ. नीळकंठ तळवलकर यांचे श्रीनिवास हे सुपुत्र होते. तळवलकर यांचे कुटुंब म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्वाचे कुटुंब आहे. तळवलकरांच्या सलग सात पिढ्या कुठलाही खंड न पडता वैद्यकिय क्षेत्रात कार्यरत राहिल्या आहेत.

Protected Content