भगवान महावीर जयंती मिरवणूक उत्साहात; विविध कार्यक्रमाचे आयोजन ( व्हिडीओ )

jain 4

जळगाव प्रतिनिधी । भगवान महावीर यांचा २६१८वा जन्म कल्याणक महोत्सवाचे आयोजन श्री सकल जैन भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले. आज सकाळी भगवान महावीर मंदीरात समाज बांधव एकत्र येवून शहरातून भगवान महावीर यांच्या प्रतिमेची रथातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सर्व समाज बांधवांचा सहभाग होता.

यशस्वितेसाठी यांनी घेतले परिश्रम
जैन कन्या मंडळातर्फे मिरवणुकीत ढोल पथक रॅली काढण्यात आली. जैन मंदिरात सकाळी 7.30 वाजता ध्वजवंदन करण्यात आले. जैन मंदीरापासून सकाळी 8 वाजता शोभयात्रा मिरवणूकीची सुरूवात करण्यात आली होती. कॉंग्रेस भवनपासून जैन मंदीर, फुले मार्केट, गांधी मार्केट, सुभाष चौक, सराफ बाजार, बोहरा गल्ली, चित्रा चौक आणि बालगंधर्व हॉलजवळ सकाळी 10 वाजता शोभयात्रेचा समारोप करण्यात आला. या पथकात गुंजन श्रीश्रीमाळ, शिवानी कावडिया, पलक कावाडिया, प्रवीण बेदमुथा, तेजल जैन, विधी कावडिया, श्रेयस मुथा, विराज कावडीया आदीनी मिरवणुकीत ढोल पथकात होते.

 

jain 5

जयश्री डागा यांचे व्याख्यान
सकाळी जैनमंदीरात कार्यक्रम आटापल्यानंतर मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकीचा समारोप बी.जे.मार्केट बालगंधर्व येथे समारोप करण्यात आली. त्यानंतर कोलकत्याहून आलेल्या प्रमख वक्त्या श्रीमती जयश्री डागा यांनी समाज बांधवांना व्याख्यानाद्वारे मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री सुरेश जैन, समाज संघपती दलूभाऊ जैन, रतनलाल बाफना, ईश्वरबाबू ललवाणी, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अनिल जैन, रमेश जैन, अजय ललवाणी यांच्यासह सकल जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर सायंकाळी 3 ते 5 वाजे दरम्यान पंचकल्याणक पुजाचे आयोजन करण्यात आले आहे.

jain 2

jain 3

jain 3

पुर्व संध्येला होते विविध कार्यक्रम
भगवान महावीर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला शहरातील सर्व जैन मंडळांच्या वतीने ‘भगवान महावीर चरित्र नाटिका’ सादर करण्यात अाली. यात भगवान महावीर यांचे जीवन दर्शन, सिद्धांत व आजचे विज्ञान या विषयावरील सादरीकरणात महावीरांचे सिद्धांत आजच्या विज्ञान युगात खूप काही महत्त्व सांगणारे असल्याचा संदेश देण्यात आला.

‘मेरे महावीर’ पुस्तकाचे प्रकाशन
बालगंधर्व नाट्यगृह येथे संध्याकाळी ७ वाजता शंकरलाल कांकरिया, राजेश ललवाणी, ज्योती जैन, निशा जैन यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या वेळी ‘मेरे महावीर’ या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले.

 

WhatsApp Image 2019 04 17 at 13.24.17

रक्तदान शिबीर
दरम्यान आज भगवान महावीर जयंतीच्या निमित्ताने दरवर्षी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येते. आज सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत 150 हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले.

Add Comment

Protected Content