निरोगी शरीर हिच आपली संपत्ती – डॉ. विनोद कोतकर

chalisgaon

चाळीसगाव (प्रतिनिधी)। प्राथमिक स्वरूपात आजाराचे निदान झाल्यास गंभीर आजारा पासुन आपले शरीर सुरक्षित राहते आपले निरोगी शरीर हीच आपली संपत्ती असून चांगला समाज घडविण्यासाठी आरोग्य शिबीर असल्याचे प्रतिपादन डॉ.विनोद कोतकर यांनी तालुक्यातील आडगाव येथे १७ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता रयत सेना शाखा आडगाव आयोजित माहिला आरोग्य निदान शिबीर व नेत्ररोग शिबिराप्रसंगी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रमाता जिजाऊ प्रतिमा पूजन करुन दिपप्रज्वलन डॉ. विनोद कोतकर, डॉ. चेतना कोतकर, डॉ. संदिप साहु, रयत सेना  संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, जिल्हाध्यक्ष संजय कापसे, सरपंच रावसाहेब पाटील, माजी सरपंच प्रकाश पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.

रयत सेना शाखा आडगाव (ता चाळीसगाव) च्या वतीने दि १७ रोजी सकाळी ९ वाजता महिला आरोग्य निदान शिबीर व नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रतिज्ञा करण्यात आली. यावेळी आई हॉस्पिटलचे संचालक डॉ. विनोद कोतकर पुढे बोलताना म्हणाले की, आजार कुठला ही असला तर त्यावर उपचार सहज शक्य असल्यावर देखील दुर्लक्ष झाल्यास त्याचे गंभीर आजारात रूपांतर होते. म्हणून बदलते राहणीमान, बदलता आहार याविषयी जनजागृती होण्याची गरज असुन आपले शरीर निरोगी राहण्यासाठी वेळेवर डॉक्टरां कडुन तपासणी करून घ्यावी चांगला समाज घडविण्यासाठी  रयत सेना व आई फाऊंडेशनच्या सयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जात असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी रयत सेना  संस्थापक अध्यक्ष गणेश पवार म्हणाले की सामाजिक भावनेतून रयत सेना आरोग्य शिबीराच्या माध्यमातून समाज आरोग्यमुक्त होण्यासाठी प्रयत्न करीत असून महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असल्याने रयत सेना व आई फाऊंडेशनच्या सयुक्त विद्यमाने महिला आरोग्य  शिबिराचे तालुक्यात आयोजन करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

महिला आरोग्य निदान शिबीरात डॉ.विनोद कोतकर, डॉ.चेतना कोतकर यांनी माहिलांची तपासणी करून मोफत औषधी वाटप करण्यात आल्या. तर डॉ.संदीप साहु यांनी ९० रुग्णांची नेत्ररोग तपासणी केली. कार्यक्रम यशस्वीवितेसाठी रयत सेनेचे आडगाव शाखाध्यक्ष राजूमामा पाटील, रवींद्र सरोदे, विलास पाटील, राजाराम पाटील, उत्तम पाटील, दामू पाटील,

 धर्मा पाटील, दौलत पाटील, बाळकृष्ण महाराज, दौलत पाटील, प्रकाश पाटील, राजेंद्र चिंधा पाटील, प्रवीण पाटील. रतन पाटील यांनी परीश्रम घेतले. यावेळी महिलांनी आरोग्य शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घेतला. आडगाव येथे महिला आरोग्य निदान शिबीरास आशा स्वयंसेविका छाया पाटील, अंगणवाडी सेविका प्रतिभा पाटील यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय पाटील यांनी केले तर आभार रवींद्र सरोदे यांनी केले महिला आरोग्य निदान शिबीरात १२० माहिलांनी लाभ घेतला.

Add Comment

Protected Content