Home Cities जळगाव हरीविठ्ठल नगरात तरूणाला बेदम मारहाण; दोन जणांवर गुन्हा

हरीविठ्ठल नगरात तरूणाला बेदम मारहाण; दोन जणांवर गुन्हा

0
107

जळगाव प्रतिनिधी । आईला शिवीगाळ करणाऱ्यांना जाब विचारल्याने तरूणाला बेदम मारहाण करत डोक्यात बाटली मारल्याची घटना हरीविठ्ठल नगरातील रेल्वेपुलाजवळ घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

सविस्तर माहिती अशी की, विक्की संजय अहिरे (वय-१९) रा. रेल्वे पुलाजवळ हरीविठ्ठल नगर हा आपल्या आई सुरेखाबाई संजय अहिरे आणि भाऊ निलेश संजय अहिरे यांच्यासह राहतो. विक्की अहिरे हा मोलमजूरी करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतो. ३० मे रोजी रात्री ९ वाजता हरीविठ्ठल नगरातील भिलवाडी परिसरात राहणारे सतिष संजू पाटील (राजपूत) (वय-२५) आणि नितीन संजय बारी (वय-२७) हे दोघे काहीही कारण नसतांना सुरेखा अहिरे यांना शिवीगाळ करत होते. आईला शिवीगाळ का करतो असे विक्कीने विचारले असता सतिषने विक्कीच्या कानात मारली तर डोक्यात बाटली मारून जखमी केले आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली. रामानंद नगर पोलीसांनी मेमो देवून जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार घेतले. रात्री १२.३० वाजता रामानंद नगर पोलीसात दोघाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेकॉ ललित भदाणे करीत आहे. 


Protected Content

Play sound