अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांची कोरोना संदर्भात आढावा बैठक

खामगाव प्रतिनिधी । शहर व ग्रामीण भागातील कोरोना चाचण्या वाढविणे, लसीकरणापूर्वी कोरोना चाचणी करणे, प्राणवायुची उपलब्धता इत्यादी बाबत तसेच रेमडेसीविरचा साठा व वितरण याबाबत आज अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी आरोग्य अधिकारी, महसूल अधिकारी व संबंधितांची आढावा बैठक घेतली. ही बैठक उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात घेण्यात आली. 

या बैठकीला उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, प्रभारी तहसिलदार सुरेखा जगताप, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिनकर खिरोडकर, गट विकास अधिकारी राजपूत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रशांत पाटील, न.प. उपमुख्याधिकारी रविंद्र सुर्यवंशी ईत्यादी अधिकारी उपस्थित होते. या बैठकित खाजगी कोविड केंद्रात दरपत्रके लावणे, देयक तपासणी करणे, भाजीपाला, फळ, दूध विक्रेते, गॅस वितरक यांची तपासणी करणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले. पेट्रोलपंपावरील कामगारांची देखील कोरोना तपासणी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

टाळेबंदीच्या काळात नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी दिले. सर्व व्यावसायीकांनी कोरोना चाचणी करवून घ्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले. ग्रामीण भागातील बाधीतांचे शाळा किंवा गृह विलगीकरण करावे, असे निर्देश त्यांनी दिले.  किराणा माल घरपोच देणा-यांची देखील कोरोना चाचणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच आरोग्य अधिकारी, कर्मचा-यांना सहाय्य करण्यासाठी सर्व विभागातील अधिकारी व कर्मचा-यांची ड्यूटी लावण्याचे आदेश त्यांनी या बैठकीत दिले.

 

Protected Content