पावसाळ्यापूर्वी रस्त्याची दुरुस्ती करा – सामाजिक कार्यकर्ते सोनार यांची मागणी

यावल प्रतिनिधी । शहरातील नगर परिषदच्या विस्तारीत वसाहतीत जलवाहीनीच्या जोडणीसाठी खोदलेले गेलेले खड्डे अद्यापही बुजलेले नाही. पावसाळा तोंडावर आला तरीही काम सुरु होण्याची चिन्हे नसल्याने गावकरी चिंतेत आहेत. पावसाळ्यापुर्वी रस्ता दुरुस्त करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते नितिन सोनार यांनी केली असून यासंदर्भात नगरपरिषदला निवेदन देण्यात आले आहे.

दरम्यान, पावसाळा लागण्यापुर्वी जर हे रस्ते दुरुस्त केल्यास वाहनधारक व पादचारी नागरीकांचे संकट टळण्याची शक्यता व्यक्त होत आहे . दरम्यान मागील तिन महीन्यांच्या कालावधीत यावल नगर परिषदच्या शहरातील विस्तारीत क्षेत्रातील सुमारे २७ते २८ कॉलन्यांमध्ये पाच कोटी७५ लाख रुपयांच्या वैशिष्टपुर्ण निधीतुन नागरीकांना शुद्ध व मुबलक पाणी मिळावे या उध्देशाने युद्धपातळीवर वेगाने जलकुंभ आणी जलवाहिनी पाईपलाईनचे टाकण्यात आली असुन सदरची पाईपलाईन टाकण्याकरिता साधारण दोन वर्षापुर्वी केलेल्या डांबरीकरण रस्त्यास खोदण्यात आल्याने पुनश्च या संपुर्ण वसाहती मधील चांगल्या स्थितीत असलेले संपुर्ण रस्ते हे खड्डेमय झाले.

 पुढील महीन्यात येवु घातलेल्या पावसाळया या वसाहती मधील रहीवासी नागरीकांना या रस्त्यांवरुन रहदारी करतांना अनेक संकटांना सामोरे जावे लागणार हे आता निश्चीत झाले आहे . विस्तारीत वसाहतीमधील फालक नगर , गंगानगर, पांडुरंग सराफ नगर , तिरुपती नगर, पुष्पतारा नगर, भास्कर नगर, आयशानगर , चांद नगर, हरीओम नगर , गणपती नगर आदी परिसरातुन जलवाहीनी पाईपलाईनसाठी मोठमोठे खड्डे खोदण्यात आले असुन येणाऱ्या पावसात याचा मोठा त्रास व प्रसंगी वाहनांचे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी नगर परिषदच्या वतीने वेळेपुर्वीच  मुख्यधीकारी बबनतडवी व नगराध्यक्ष नौशाद मुबारक तडवी यांनी तात्काळ या संकटावर उपाययोजना करावी अशी मागणी सामाजीक कार्यकर्ते नितिन सोनार यांनी नगर परिषदचे अभीयंता योगेश मदने यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली  आहे .

 

Protected Content