प्रत्येकाने वयानुसार तसेच काळासोबत बदलावे ; माजी खासदार प्रदीप गांधी

WhatsApp Image 2019 08 25 at 6.52.37 PM

जळगाव, प्रतिनिधी | प्रत्येक वयानुसार व्यक्तीच्या आयुष्यात कर्तव्य बदलत असते. त्याप्रमाणे प्रत्येकाने वयानुसार तसेच काळासोबत बदलत रहावे. तिशी ओलांडली तरीही मुलांची विवाह होत नाही याचे चिंतन करून उपाय शोधले पाहिजे, असे प्रतिपादन छत्तीसगड येथील माजी खासदार प्रदीप गांधी यांनी केले. जळगाव माहेश्वरी विवाह सहयोग समितीतर्फे शहरात २६ वा अखिल भारतीय वधू वर परिचय मेळावा घेण्यात आला. यावेळी प्रदीप गांधी बोलत होते.

मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून अ. भा. संयुक्त मंत्री सतीश चरखा, माजी महापौर नितीन लढ्ढा, सहयोग समितीचे संस्थापक अध्यक्ष बाळकृष्ण बेहेडे, अध्यक्ष शामसुंदर झंवर, जिल्हा अध्यक्ष मनीष झंवर, उपाध्यक्ष वासुदेव बेहेडे, सचिव सुरजमल सोमाणी, डॉ. जगदीश लढ्ढा, सुभाष जाखेटे, विवेक सोनी, प्रकल्प प्रमुख विनोद मुंदडा, माणकचंद झंवर आदी उपस्थित होते.  प्रस्तावनेत सुरजमल सोमाणी यांनी मेळाव्या मागील भूमिका विशद केली. यावेळी वधु-वर परिचय पुस्तिकेचे मान्यवरांनी प्रकाशन केले. तसेच समाजातील वधू-वरांची माहिती असलेले मोबाईल एप ‘माहेश्वरी विवाह सहयोग एप’ चे मान्यवरांनी विमोचन केले. हे एप विशाल मंत्री, परेश जखोटिया ( नाशिक ) यांनी बनविले आहे. यावेळी जिल्हा अध्यक्ष मनीष झंवर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रदीप गांधी यांनी सांगितले की, संस्काराची शिदोरी ज्येष्ठ पिढी पुढील पिढीला देण्यास तयार आहे मात्र नवी पिढी त्यांच्या जगात व्यस्त आहे. शेतकरी एक मुठ धान्य पेरतो आणि शेतातून पोतेभर धान्य मिळवितो. त्याचप्रमाणे ज्येष्ठांच्या अनुभवाची शिदोरी पिढीजात पुढे गेली पाहिजे. संसारात तडजोड असली पाहिजे, असेही ते म्हणाले. सूत्रसंचालन बी. जे. लाठी, अश्विनी देपुरा, जगदीश जाखेटे, राधिका जाखेटे, रमण लाहोटी, मयूर जाखेटे, वैष्णवी झंवर, निधी भट्टड, यांनी तर आभार जगदीश लढ्ढा यांनी मानले.

मेळ्याव्यात जुळले १५ विवाह

संमेलनात देशभरातील ५३९ विवाहेच्छुक वधू-वरांनी नाव नोंदणी केली होती. त्यातील सुमारे ३५० युवक युवतींनी त्यांचा मंचावरून परिचय करून दिला. राज्यासह कर्नाटक, छत्तीसगड, राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात, दिल्ली या राज्यातील विवाहेच्छूक वधू-वरांनी उपस्थिती दिली होती. मेळाव्यात विवाहेच्छूक वधू-वरांसह त्यांच्या पालकांनी एकमेकांशी संवाद साधला. मेळाव्यात १५ विवाह जुळले. मेळावा यशस्वीतेसाठी सुनील झंवर, सुनील मंत्री, संजय बिर्ला, राहुल झंवर, कैलास लाठी, दीपक लढ्ढा, राधेशाम बजाज, तेजस देपुरा, गिरीश झंवर, प्रदीप मनियार, पुष्पा झंवर, वासंती बेहेडे, रुपाली लाठी, योगेश कासट, सुरेश न्याती, दीपक कासट, अभिजित झंवर, अजय दहाड, योगेश मंडोरा, वीणा सोमाणी, भारती झंवर, शिवनारायण तोष्णीवाल, उर्मिला झंवर, लोकेश राठी, नरेंद्र काबरा, नितीन देपुरा आदींनी परिश्रम घेतले.

Protected Content