जिल्ह्यात आज ८४ रूग्ण बाधित आढळले; १४३ रूग्ण झाले कोरोनामुक्त

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाकडून कोरोना अहवालात आज ८४ रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहे तर १४३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. विशेष बाब म्हणजे आज एकाही रूग्णाचा मृत्यू झालेला नाही. जिल्ह्यात बाधित संख्या ५३ हजाराच्या पार झाला आहे.

आजची आकडेवारी
जळगाव शहर – २२, जळगाव ग्रामीण- ०२, भुसावळ-२१, अमळनेर-०५, चोपडा-०४, पाचोरा-०२, भडगाव-०१, धरणगाव-०६, यावल-०१, एरंडोल-००, जामनेर-०२, रावेर-०२, पारोळा-०३, चाळीसगाव-०६, मुक्ताईनगर-०१, बोदवड-०४, इतर जिल्ह्यातील-०२ असे एकुण ८४ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे.

जिल्ह्यात एकुण कोरोना रूग्ण संख्या ५३ हजार ३३ वर पोहचली आहे. त्यापैकी ५० हजार ७३४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज एकाही रूग्णाचा मृत्यू झाला नाही. एकुण मृत्यूचा आकडा १२५९ वर पोहचला आहे. रूग्ण रिकव्हरी रेट ९५.६६ टक्क्यांवर पोहचला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

Protected Content