खडसे महाविद्यालयात “आयटी पर्व २०२३” स्पर्धा उत्साहात

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर शहरातील जी.जी.खडसे महाविद्यालयात संगणक शास्त्र विभागांतर्गत आयटी पर्व २०२३ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यात तीन वेगवेगळ्या भागांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली.

क्विज कॉन्टॅक्ट, पोस्टर प्रेझेन्टेशन, सीसीप्लसप्लस प्रोग्रामिंग, यामध्ये जळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या महाविद्यालयातुन एकूण 193 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमंत महाजन यांनी भूषविले. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. रोहिणी खडसे यांनी उपस्थिती दिली.

विद्यार्थ्यांनी अशा विविध कार्यक्रमात भाग घेऊन त्यांनी संशोधनातील आपली रुची वाढवावी व संगणक शास्त्र विषयात नवीन आलेल्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा याबद्दल  मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. ए .पी .पाटील उपस्थित होते .कार्य कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगणक शास्त्र विभागातील प्रा.सौ वंदना विजय चौधरी यांनी केले. त्यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचा हेतू व उद्दिष्ट सांगितले.

सदर कार्यक्रमाचे बक्षीस वितरण संस्थेचे सचिव मा. डॉ. सी .एस. चौधरी यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे परीक्षण प्रा.मोनाली खाचणे, प्रा. श्वेता फेगडे, प्रा. डॉ. रवींद्र किनगे व प्रा.डॉ. सी .जे. पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकिता प्रजापती, देवयानी पाटील या विद्यार्थिनींनी केले तर आभार प्रदर्शन संगणक शास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख प्रा. सीमा राणे व प्रा. डॉ. रंजना झिंजोरे यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी संगणक शास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.

Protected Content